भुसावळ (प्रतिंनिधी ):- शहरातील गुढी पाडव्यानिमित्त जुना सातारा भागात दर वर्षी यात्रोत्सव भरवला जातो परंतु कोरोनो व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा यात्रोत्सव व यात्रोत्सवात ओढल्या जाणार्या बारागाड्यादेखील न ओढण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जगात 140 पेक्षा देशात कोरोनो व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला असून चीन पासून सुरू होऊन तो संपूर्ण जगत पसरला आहे. याचे भारतासह महाराष्ट्रात ही प्रमुख शहरात कोरोनो व्हायरस पसरत असून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे होते. यावेळी जुने सातारा भागातील ग्रामस्थांची उपस्थिती होती. गर्दीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून बारागाड्या न ओढण्यासह यात्रोत्सव न भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. जगत जननी मरीमाता देवीची पूजा भगत व गावकरी विधीवत पणे पार पडतील, असे बैठकीत ठरवण्यात आले. या बैठकीला नगरसेवक युवराज लोणारी, शेखर इंगळे, सतीश सपकाळे, सागर ठोके, देवेंद्र सपकाळे, चेतन पाटील, भीमराज कोळी, पंडित भिरुड नरेंद्र लोखंडे, दीपक धांडे, वसंत पाटील, सागर वाघोदे, भागवत पाटील, विनोद तायडे, , विशाल ठोके, कडू पाटील, रमेश कोळी, चुडामण भोळे, कुढापा मंडळ सदस्य व जुना सातारा भागातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.