जळगाव जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली कॅशलेस

जळगाव : - जामनेर तालुक्यातील बेटावद बुद्रुक ग्रामपंचायतीने नवीन तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करत पंचायत समितीच्या मार्गदर्शनाने कॅशलेस व्यवहार सुरु केल्याने असे पारदर्शक व्यवहार करणारी बेटावद बुद्रुक ग्रामपंचायत जळगाव जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे .


आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातुन ऑनलाईन यंत्रणेचा वापर करत जळगांव जिल्ह्यातील पहिला कॅशलेस व्यवहार बेटावद बु. ग्रामपंचायतीने केल्याने जामनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे .


ग्रामपंचायतींचे 14व्या व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचे सर्व व्यवहार PFMS च्या माध्यमातुन चेक किंवा कँश ने नकरता निव्वळ ग्रामसेवक व सरपंच यांचे DSC नेच आँनलाइन करुन पारदर्शकता आणण्याचा मानस असतांना त्याचधर्तीवर जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावद बु. ही ग्रामपंचायत पहिल्या क्रमांकाने PFMS INTEGRATE झाली आहे व आँनलाईन पेमेंट व्हावचरने फंड ट्रान्सफर ऑर्डर FTO SIGN करुन आपले सरकार सेवा केंद्र माध्यमातुन ( ASSK) ची एप्रील ,मे आणि जून 2020 या तिन महिन्यांचे पेमेंट जि.प खात्यात यशस्वीपणे अदा करण्यात आले. अशाच प्रकारे आयोगाच्या निधीतुन मक्तेदारांनाही पेमेंट अदायगी केली जाणार आहे.


पंचायत समिती जामनेर एएसएसकेचे तालुका व्यवस्थापक, नंदबोधी तायडे यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत PFMS INTEGRATE ( पब्लीक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम ) सलग्न होण्याचा पहिला मान जामनेर तालुक्याला मिळवुन दिला. बेटावद बु. ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी , सरपंच व केंद्रचालक यांनीसुध्दा या नविन प्रणालीला स्विकारुन आदर्श निर्माण केला.


पंचायत समिती जामनेरचे गटविकास अधिकारी, एन . आर . पाटील व सर्व विस्तार अधिकारी यांचे प्रशासकीय पातळीवरील सहकार्य लाभले. आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) प्रकल्पाअंतर्गत सुजाता तुबे (मास्टर ट्रेनर, नाशिक विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले.


तसेच जिल्हा व्यवस्थापक धोटे यांचे सहकार्य मिळाले. लवकराच ही प्रक्रीया सर्व ग्राम पंचायतमध्ये राबविली जाईल ,असे सुतोवाच प्रकल्प तालुकाव्यवस्थापक नंदबोधी तायडे यांनी केले आहे. जामनेर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सर्व व्यवहार पारदर्शक होण्याची प्रक्रीया सुरु झाली हि गौरवास्पद बाब आहे.