महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचा  राज्यस्तरीय स्नेह मेळावा

नाशिक-  महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचा  राज्यस्तरीय स्नेह मेळावा  मालेगाव  जिल्हा  नाशिक येथे  रविवार २२ नोव्हेंबर रोजी आयोजित केला आहे. हा मेळावा म्हणजे आपल्या माणसांच्या हितासाठी आपणच घडविलेली एक सुसंवादाची भेट असणार आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे व महाराष्ट्र राज्याचे  कृषी व सहकार मंत्री  दादासाहेब भुसे व ख्यातनाम अभिनेत्री सुनिता तोमर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


 त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुरोगामी पत्रकार संघाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विजयजी सुर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात पुरोगामी संघाची ध्येय धोरणे ,उद्देश, घटना , सामाजिक  जबाबदारी , सर्वसमावेशक घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक उपक्रम, याबरोबर सामाजीक , सांस्कृतिक , शैक्षणिक , कृषी, उद्योग याबाबत खुली चर्चा होणार आहे.    या मेळाव्यास आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय असणार आहे सन्माननिय सुर्यवंशी साहेब यांनी


 स्नेहमेळाव्याची जबाबदारी  कार्यरत माननीय प्रकाशजी चितळकर व  टिम माननीय यांच्यावर सोपविली आहे. तसेच यास प्रविणजी परमार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 


सर्वांनी या मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या जिल्हा तथा तालुका पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थितीची माहिती राज्य उपाध्यक्ष प्रकाश चितळकर यांना कळवावी.  ८३०८४६१३७७ या नंबर वर संपर्क साधावा.