राजेंद्र चौधरी यांची रा. कॉ. जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

वरणगाव -  येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी ही नियुक्ती केली. यावेळी राष्ट्रवादीचे भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय. आर पाटील, माजी नगरसेवक विष्णू खोले आदी उपस्थित होते.


या निवडीबद्दल त्यांचे पुरोगामी पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद पवार, महाराष्ट्र कोषाध्यक्ष सुनील चौधरी, महाराष्ट्र संघटक अमोल सोनार तसेच सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.